फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरील संवाद आणि नातेसंबंध बसवंत विठाबाई बाबाराव १६ मार्च २०२६

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारखी समाजमाध्यमं आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाली आहेत. पण या माध्यमांचा वापर करताना छोट्या छोट्या गोष्टींवरूनही किती मोठे गैरसमज निर्माण होतात आणि नातेसंबंधात दुरावा येतो, हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. ऑनलाईन दिसणं, मेसेजला उशिरा उत्तर येणं, प्रोफाईल फोटो दिसणं-न दिसणं किंवा स्टेटस पाहणं अशा साध्या गोष्टींवरून लोक लगेच निष्कर्ष काढतात आणि नात्यात ताण निर्माण होतो. अशाच क…